esakal | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर झाली मिटिंग. मुंबईत पुन्हा लागणार कडकडीत लॉकडाऊन ?
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर झाली मिटिंग. मुंबईत पुन्हा लागणार कडकडीत लॉकडाऊन ?

मुंबईत राजकीय बैठकांचा सपाटा सुरूच आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर झाली मिटिंग. मुंबईत पुन्हा लागणार कडकडीत लॉकडाऊन ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत राजकीय बैठकांचा सपाटा सुरूच आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान म्हणजेच 'वर्षा' बंगल्यावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मुंबईतील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समजतेय.  

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते, अनेक बैठका घेत होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठकांचा धडाका लावलाय. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. सर्व मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री हे शरद पवारांना भेटले. शरद पवारांसोबत त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. लगोलग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची देखील मिटिंग लावलीये.

मोठी बातमीपनवेलमध्ये लॉकडाऊन असूनही सहा दिवसांत तब्बल 'इतक्या' जणांना कोरोनाची लागण

मुंबईमध्ये लागणार कडक लॉकडाऊन ? 

टीव्ही रिपोर्टमनुसार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुणे, रायगड आणि ठाण्यामागोमाग आता मुंबईत कोरोनाबाबत काय निर्णय घ्यायचा, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा का ? याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. 


मोठी बातमीठाण्यातील लॉकडाऊन बाबत आली 'मोठी' बातमी, 'इतक्या' दिवसांसाठी वाढला ठाण्यातील लॉकडाऊन...
 

शिवसेना आमदारांची बैठक सुरु 

यानंतर लगेचच्या आता मुख्यमंत्री मुंबईतील शिवसेना आमदारांसोबत मिटिंग घेतायत. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार मुंबईतील आहेत. अशात मुंबईत लॉकडाऊन किंवा अनलॉकचा निर्णय घेताना लोक प्रतिनिधींना विचारात घ्यावं असं ठरलं होतं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आमदारांची बैठक सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान आता मुंबईत कडकडीत लॉकडाऊन लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

after pune and thane strict lockdown in mumbai might be implemented