

Mumbai Navy soldier and his family Found Dead
ESakal
मुंबई : कफ परेड येथील नेव्ही नगरात नौदलातील जवान पुरणमल शंभूलाल मेहरा (वय ३०) याने पत्नी ओमा (२८), मुलगा यश (३) आणि दोन महिन्यांचा मुलगा दर्श यांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेहरा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. कौटुंबिक व नोकरीतील तणावातून हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.