esakal | पार्थ यांच्यावरील 'कवडीची किंमत देत नाही' मतानंतर आज NCP च्या बड्या नेत्यानं म्हटलं 'नया है वह'
sakal

बोलून बातमी शोधा

पार्थ यांच्यावरील 'कवडीची किंमत देत नाही' मतानंतर आज NCP च्या बड्या नेत्यानं म्हटलं 'नया है वह'

शरद पवार यांच्या पार्थ पवारांवरील वक्तव्यानंतर आज राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पार्थ पवारांवर आपलं मत मांडलंय.

पार्थ यांच्यावरील 'कवडीची किंमत देत नाही' मतानंतर आज NCP च्या बड्या नेत्यानं म्हटलं 'नया है वह'

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पार्थ पवारांबद्दल आपलं मत मांडलं आहे. काल शरद पवार यांनी पार्थ यांना आपल्या रोखठोक भूमिकेतून सुनावलं होतं. पार्थ यांनी केलेली सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील CBI मागणी अपरिपक्व असल्याची टिपणी शरद पवारांनी केलेली. पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत देत नसल्याचंही शरद पवार म्हणाले होते. 

मोठी बातमी - पार्थ यांची आदल्यादिवशीच झाली होती भेट, सुप्रिया सुळेंनी टाकला होता इंस्टावर 'तो' फोटो...

नया है वह ! 

शरद पवार यांच्या पार्थ पवारांवरील वक्तव्यानंतर आज राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पार्थ पवारांवर आपलं मत मांडलंय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पार्थ पवारांबद्दल विचारलं असता त्यांनी पार्थ पवार यांना उद्देशून 'नया है वह', असं म्हटलं आहे. आता छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल मांडलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू शकतं. 

मोठी बातमी - आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

अजित पवार नाराज आहेत का ? 

शरद पवारांच्या कालच्या वक्तव्यावरून अजित पवार नाराज आहेत का, असंही छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं. याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी अजित पवार अजिबात नाराज नाहीत असं म्हटलंय. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर पक्षाला सावरण्याची भूमिका घेतली. कालच्या प्रकरणानंतर बोलताना पवार कुटुंबामध्ये कोणतेही वाद विवाद नसल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. 

after sharad pawar chagan bhujbal says naya hein waha comment on parth pawar

loading image
go to top