विशेष प्राधिकरण झाल्यानंतर  ‘म्हाडा’चा आलेख चढता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

सरकारने म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर चांगली प्रगती झाली आहे. वर्षभरात म्हाडाकडे इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसह एकूण ६२५ प्रस्ताव आले आहत्त. त्यातून म्हाडाकडे सुमारे सहा लाख नवी घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

मुंबई - सरकारने म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर चांगली प्रगती झाली आहे. वर्षभरात म्हाडाकडे इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसह एकूण ६२५ प्रस्ताव आले आहत्त. त्यातून म्हाडाकडे सुमारे सहा लाख नवी घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

मुंबई हद्दीतील १४४ अभिन्यासांच्या जमिनीवरील नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडाला मिळाले आहेत. २३ मे २०१८ रोजी सरकारने अध्यादेशाद्वारे म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा बहाल केल्यानंतर वर्षभरात त्यांनी चांगली प्रगती केली आहे. म्हाडाच्या जुन्या वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांच्या मंजुरीसाठी अभिन्यास मंजुरी कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहर)अंतर्गत स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. ६२५ पैकी ५४० प्रस्तावांना परवानगी मंजुरी देण्यात आली आहे. ५४० प्रस्ताव पाठविणाऱ्या शहरातील सुमारे ३५० इमारतींच्या कामातून अंदाजे १० हजार ५०० सदनिका पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार आहेत. 

Web Title: After the special authorit the MHADA chart is up

टॅग्स