esakal | दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?

लसीकरण न करण्याचा सल्ला धुडकावल्याचा आरोप, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण होणार स्पष्ट

दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 04 : लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर भिवंडी येथील एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना प्रथचम समोर आली आहे. मात्र, या नागरिकाचा मृत्यू कोरोना लसीकरणानंतर मृत्यू झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  जोपर्यंत शवविच्छेदन रिपोर्ट येत नाही तोपर्यंत या मृत्यूमागचे नेमके कारण काय हे स्पष्ट होणार नाही असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि जेजे रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. दरम्यान, या व्यक्तीचा मृत्यू 99 टक्के् लसीमुळे झालेला नाही असे स्पष्टीकरण भिवंडी आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. 

45 वर्षीय सुखदेव किरदात हे भिवंडीच्या मनोरमा नगर येथील स्थानिक असून एका खासगी रुग्णालयाचा ड्रायव्हर म्हणून काम करत होते. पण, मंगळवारी ते कोरोनावरील लस कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी भाग्या नगर येथील लसीकरण केंद्रात गेले. किरदात यांना लस दिल्यानंतर त्यांना पुढील 15-20 मिनिटांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असता ते बेशुद्ध झाले. त्यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय इंदिरा गांधी मेमोरियल मध्ये दाखल केल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे नेल्यानंतर किरदात यांना मृत घोषित केले गेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जे.जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दिला गेला. मात्र, अजूनही शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही. या अहवालाला किमान दोन आठवडे जातील असे ही सांगण्यात आले  आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतल्या 'या' 29 खासगी रुग्णालयात मिळणार कोरोना लस, वाचा संपूर्ण यादी

किरदात यांनी पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना कोणतीही समस्या आली नाही. त्याचसोबत, ते गेली तीन वर्ष उच्चरक्तदाबावरील औषधे सुद्धा घेत होते. त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा असे म्हटले की, गेल्या एक वर्षापूर्वी सुद्धा ते बेशुद्ध झाले होते. त्याचसोबत किरदात हे दारुचे सेवन सुद्धा करायचे. मात्र, आता त्यांचे शवविच्छेदन रिपोर्ट्स समोर येईपर्यंत काहीच सांगता येणार नाही.

99 टक्के लसीमुळे मृत्यू नाही ?

दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. कारण, या व्यक्तीला आधीपासून उच्चरक्तदाब होता. इतर हृदयविकार असण्याची ही शक्यता आहे. त्यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नसला तरी 99 टक्के त्यांचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. दुसऱ्या डोसच्या दिवशी ही ती व्यक्ती उच्चरक्तदाबाचे औषध घेऊन आली होती. तीन ते चार वर्षांपासून ते उच्चरक्तदाबाने ग्रस्त होते. कदाचित हृदयविकाराचा झटका आला असावा असे नाव न सांगण्याच्या अटीवर भिवंडीचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. 

after taking second corona vaccine dose man from bhiwandi lost live postmortem report awaits

loading image