Coronavirus : गर्दीच्या 'त्या' व्हिडिओनंतर मध्य रेल्वेतील कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबत दिलासा

local train
local train

मुंबई : मध्य रेल्वेने परेल आणि माटुंगा वर्कशॉप सुरू केल्याने, या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी कर्मचारी विशेष लोकल सोडण्यात आल्या होत्या. मात्र यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये होणाऱ्या गर्दीचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची संख्या 97 टक्यांपर्यत कमी करून फक्त 7 टक्के म्हणजेच 500 कर्मचारीच कामावर उपस्थित राहणार आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सोडल्या आहेत. तर आता अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज 100 ट्रेनच्या 200 फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी या दरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसाठी सोडलेल्या लोकलमध्ये गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे उघड झाले होते. फिजिकल डिस्टंन्सिंगचाही पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती असून रेल्वे कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे माटुंगा वर्कशॉपमध्ये नुकतीच एक बैठक होऊन, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

After thavideo of the crowd, the Central Railway staff was relieved about the attendance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com