लॉकडाऊनमध्ये धाडसी प्रवास, तीन दिवस अनवाणी पायपीट करत तिने गाठले घर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

सुरेखा (नाव बदलले आहे) हीचा भाऊ कामधंद्यासाठी पत्नी आणि मुलांसह पुण्याला स्थलांतरीत झाला होता. पुण्यात रोजगार मिळत असल्यामुळे त्याने सुरेखाला देखील पुण्यात बोलावून घेतले होते.

खर्डी : लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या एका पंधरा वर्षीय मजूर मुलगी पुणे-पनवेल रेल्वे मार्गाने सलग तीन दिवस अनवानी चालत प्रवास करत, शहापुर तालुक्यातील दळखण गावी पोहचली. ही मुलगी धाडस दाखवत घरी आल्याने तीचे गावात कौतूक होत आहे. प्रवासादरम्यान तीन दिवस फ़क्त पाणी पीत चौथ्या दिवशी घरी पोहचे पर्यंत मुलीची प्रकृती खालावली होती. यावेळी सरपंच भगवान मोकाशी व ग्रामसेविका माधुरी कदम यांना कळताच सदर मुलीची आरोग्य तपासणी करुन तीला जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन केले आहे. ग्रामपंचायतीकडून या मुलीची काळजी घेतली जात असल्याचे सरपंच मोकाशी यांनी सांगितले.

नक्की वाचा कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

सुरेखा (नाव बदलले आहे) हीचा भाऊ कामधंद्यासाठी पत्नी आणि मुलांसह पुण्याला स्थलांतरीत झाला होता. पुण्यात रोजगार मिळत असल्यामुळे त्याने सुरेखाला देखील पुण्यात बोलावून घेतले होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे घरातील पैसे धान्य देखील संपले. घरात भांडणे होऊ नयेत म्हणून सुरेखाने रेल्वे मार्गावरुन मुंबईच्या दिशेने पायी चालत गावचा रस्ता धरला. सलग तीन दिवस ती रेल्वे मार्गावरुन चालत होती. टिटवाळा येथे आल्यानंतर पोलिसांनी तीची विचारपुस करत तीला मुंबई गोवी महामार्गावर सोडून तीच्या गावचा मार्ग सांगितला. त्यानंतर ती चालत गावी पोहचली.

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

मुलीच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार 
दरम्यान दळखण येथील घराची पूर्ण दुरावस्था झाली असून आई-वडील दोघेही मुलीची काळजी घेत नसल्याने सुरेखाला यापुढे रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच भगवान मोकाशी यांनी संगितले आहे. सरपंच भगवान मोकाशी आणि ग्रामसेविका माधुरी कदम यांनी मुलीला मदत करत माणूसकीचे दर्शन घडवले.

After three days of barefoot piping, she reached home 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After three days of barefoot piping, she reached home