नाही तर डोस दिला जाणार नाही, मुंबई महापालिकेची भूमिका

समीर सुर्वे
Sunday, 17 January 2021

संबंधित व्यक्तीच्या फोनवर तीन वेळा संपर्क साधला जाणार असून तीन वेळा प्रतिसाद न दिल्यास डोस मिळणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

मुंबई: कोविडच्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. यात एक लाख 45 आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीच्या फोनवर तीन वेळा संपर्क साधला जाणार असून तीन वेळा प्रतिसाद न दिल्यास डोस मिळणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

कोविड लस मिळणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर तीन वेळा मेसेज पाठवला जाईल तसेच तीन वेळा संपर्कही केला जाईल. मात्र, तिन्ही वेळेस कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास लस दिली जाणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर मेसेजमध्ये कोणत्या केंद्रात किती वाजता पोहचायचे याचीही माहिती दिली जाणार आहे. त्या केंद्रातच ही लस घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यासाठीही मेसेज पाठवला जाणार आहे, असेही सांगण्यात आले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार 16 जानेवारी सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये झाला. त्यानंतर, मुंबईतील इतर लसीकरण केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी हेल्थ केअर वर्कर्स आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरणात पाहायला मिळाले. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 9 आणि राज्य शासनाचे एक अशा एकूण 10 केंद्रांवर मिळून पहिल्या दिवशी 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली होती. 

हेही वाचा- कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?, संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर खोचक टीका

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

After the three times phone not respond will not get the dose bmc decision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the three times phone not respond will not get the dose bmc decision