लॉकडाऊन शिथील, कोरोनाचा फैलाव सुसाट; महिनाभरात सोसायट्यांमधील रुग्णसंख्येत 'इतके' टक्के वाढ

लॉकडाऊन शिथील, कोरोनाचा फैलाव सुसाट; महिनाभरात सोसायट्यांमधील रुग्णसंख्येत 'इतके' टक्के वाढ

मुंबई : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांनी आपले नियम शिथील केल्याचे चित्र आहे. या कारणामुळे मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महिनाभराच्या काळात मोठ्या इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 108 टक्क्याने वाढली. तर झोपडपट्टी भागातील कोरोना संसर्ग तुलनेने आटोक्यात असून त्यामध्ये 60 टक्क्याने वाढ झाली आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनूसार 7 जून रोजी मुंबईत कोरोना रुग्ण सापडल्याने तब्बल  4,538  इमारती सिल केल्या गेल्या. या इमारतीत 9,956 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र जुलै महिन्यात या सिल केलेल्या  इमारतींची संख्या 4,538 वरुन  6235 एवढी वाढली आहे. या इमारतीत 9.33 लाख लोक राहतात. तर या रुग्णांची संख्या 20,757 एवढी झाली आहे. म्हणजे एकाच महिन्यात 10,799  रुग्ण वाढले आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्राच्या संख्येत घट

गेल्या महिनाभरात मुंबईत रुग्णसंख्येच्या वाढीला ब्रेक लागल्याने प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या कमी झाली. 9 जून रोजी मुंबईतील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या 798 एवढी होती. या  क्षेत्रात  रुग्णांची संख्या 18,957 एवढी होती. मात्र 17 जुलै रोजी कंटेंटमेंट झोनची संख्येत वाढ होऊन आता प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 708 झाली आहे. मात्र दूसरिकडे रुग्णांची संख्या 18,975 वरुन 30,435 एवढी वाढली आहे.

आर वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजे (बोरीवली) 720 इमारती सिल केल्या गेल्या. या इमारतीमध्ये 1001 कोरोना रुग्ण सापडले आहे. तर सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या 1608 जी दक्षिण वार्डात 177 इमारती सिल करण्यात आल्यात.

मोठ्या इमारतीच्या तुलनेत झोपडपट्टी भागात संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात यश मिळाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र ल़ॉकडाऊन शिथील झाल्यानंतर या इमारतीतील रुग्णसंख्या वाढली आहे. या दरम्यान अनेक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण घरातच विलगीकरणात राहणे पंसत करत असल्यामुळे या संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सिल झालेल्या इमारतींची संख्या 

  • 9 जून-  4,538 
  • 17 जुलै-  6235

सोसायट्यामधील  रुग्णसंख्या 

  • 9 जून- 9,956
  • 17 जुलै- 20,757

महिनभरात वाढले 10,799 रुग्ण 

प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या घटली

  • 9 जून- 798 | रुग्ण संख्या- 18,957
  • 17 जुलै- 708 | रुग्ण संख्या - 30,435
  • 90 प्रतिबंधीत क्षेत्र कमी, मात्र रुग्ण 11,496 ने वाढले 

सोसायट्यांमध्ये रुग्ण वाढीची कारणे 

  • सोसायट्यात प्रवेशांची नियमावली शिथील 
  • सोसायट्यांत पाहुणे, घरकाम करणारे आणि लोकांना  मिळाली परवानगी   
  • इमारतीत अनेकजण नोकरीनिमीत्त घराच्या पडताहेत
  • सौम्य लक्षणे असणारे कोरोना बाधित घरातच अलगीकरणात राहताहेत.

( संकलन - सुमित बागुल )

after unlock covid 19 percentage residential societies increased by 108 percent 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com