तलवार कुणा विरोधात उपसणार? विजय वडेट्टीवरांचा संभाजीराजेंना सवाल

तुषार सोनवणे
Friday, 9 October 2020

तुळजापूर येथे संभाजीराजे यांनी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा दिला. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांना छत्रपती संभाजीराजे आणि काही मराठा संघटनांनी विरोध केला होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी साठी तिसऱ्या पर्वाला तुळजापूरहून सुरूवात झाली. त्यात संभाजीराजे यांनी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा दिला. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट रात्री साडेअकरापर्यंत सुरू; असोसिएशनच्या मागणीनंतर पालिकेचा नवा निर्णय

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तुळजापूर येथून त्यांनी मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाची सुरूवात केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले.

फेक टीआरपी प्रकरण! रिपब्लिक टीव्हीच्या सीएफओसह पाच जणांना पोलिसांचा समन्स

संभाजीराजेंच्या या विधानावर ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, 'राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे. वडेट्टीवार यांनी एमपीएससी परीक्षेबाबत आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की, परीक्षा होऊ द्यावी. आरक्षणाचे प्रश्न सरकार पूर्ण प्रयत्नाने सोडवित आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षाच देऊ नये हे योग्य नाही. 

वडेट्टीवरांच्या प्रतिक्रियेवर समाजमाध्यमांतून नेटकरी व्यक्त होत आहे. संभाजीराजे आणि वडेट्टीवरांच्या शाब्दिक चकमकींवरही चांगलीच चर्चा रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against whom will the sword be drawn Vijay Vadettis question to Sambhaji Raje