ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट रात्री साडेअकरापर्यंत सुरू; असोसिएशनच्या मागणीनंतर पालिकेचा नवा निर्णय

ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट रात्री साडेअकरापर्यंत सुरू; असोसिएशनच्या मागणीनंतर पालिकेचा नवा निर्णय
Updated on

ठाणे  ः `मिशन बिगीन अगेन`अंतर्गत 5 ऑक्टोबरपासून शहरातील हॉटेल आण बार-रेस्टॉरंट सकाळी नऊ ते सांयकाळी सात पर्यंत सुरू करण्यात आली. परंतु, हॉटेल आणि बार असोसिएशनने केलेल्या मागणीनंतर आता ठाणे महापालिकेने 10 ऑक्टोबरपासून सकाळी सात ते रात्री साडेअकरापर्यंत बार आणि रेस्टाॅरंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हॉटस्पॉटमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.

शहरातील हॉटेल, बार, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट 5 ऑक्टोबरपासून सुरू झाले. परंतु, ठाण्यातील केवळ दहा टक्केच बारच सुरू झाले होते. हॉटेल आणि बारचा खरा व्यावसाय सायंकाळी सातनंतर सुरू होतो. त्यामुळे बार असोसिएशनने वेळेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता शनिवार (ता. 10)पासून हॉटेल व बार यांच्या वेळेत बदल करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महापालिकेने त्या संदर्भात नवा आदेशही काढला आहे. 

हॉटस्पॉटमधील बंधने कायम 
ठाण्यातील 18 हॉटस्पॉटमधील बंधने कायम ठेवण्यात आली आहेत. हॉटस्पॉटमधील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू होणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. हॉटस्पॉटमध्ये हॉटेल वा बार सुरू असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने आदेशात दिला आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com