

Agarkot Fort
ESakal
रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मात्र, देखभाल आणि दुरुस्तीअभावी या किल्ल्याची तटबंदी जीर्ण झाली असून भुयारी मार्ग माती-वाळूने भरले आहेत. किल्ल्यातील तोफा, शिलालेख आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे. परिसरात नव्याने इमारती उभ्या राहत असल्याने तटबंदीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.