Dhangar Reservation Protester Jumped
Dhangar Reservation Protester JumpedESakal

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या

Dhangar Reservation Protester Jumped: मंत्रालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धनगर आरक्षणासाठी आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे वातावरण तणावाचं बनलं आहे.
Published on

Dhangar Reservation Protester Jumped: मुंबईत धनगर आरक्षणावर आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासाठी मंत्रालायच्या जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आरक्षण किंवा मागणीसाठी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारणं हे नित्याचं ठरलंय. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. यातून निष्पन्न, तर काही होत नाही. मात्र हे आंदोलक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यातून समाजामध्ये वेगळाच संदेश जात असून, यावर मंत्रालय प्रशासन काय कार्यवाही करणार, अशी चर्चा आहे.

धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्द्यावरून धनगर समाज आज आक्रमक झाला. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते आज मंत्रालयात आले होते. मात्र यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. तसेच जोरदार आंदोनल छेडले. यानंतर गोंधळ निर्माण झाला आहे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यानी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलक कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Dhangar Reservation Protester Jumped
Sharad Pawar: वस्ताद लागले कामाला! १४ तारखेला मोठा पक्षप्रवेश; अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदाराचीही घरवापसी

या घटनेत कोणीही आंदोलकांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. धनगर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील मेंढपाळ समुदाय अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. केंद्राच्या डेटाबेसमध्ये 'धनगर' असा उल्लेख नसून त्याऐवजी 'धनगड' हा एसटीचा भाग म्हणून ओळखल्याने कोट्यापासून वंचित राहिल्याचे समुदायाचे म्हणणे आहे. धनगर समाज हे सध्या भटक्या जमातींच्या यादीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com