द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी करार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे अपघात पूर्णपणे थांबले जाऊन सुरक्षित प्रवास व्हावा, तसेच प्रवाशांच्या जिवाला अपघाताचा धोका जाणवू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सेव्ह लाइफ फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग हे संयुक्‍तरीत्या महामार्गावर झालेले अपघात, त्यात गेलेले बळी, अपघाताच्या वेळची परिस्थिती याचा अभ्यास करणार आहे. यानंतर काही प्रकल्प हाती घेणार आहे. यामध्ये अपघात झाल्यानंतर ताबडतोब अपघातस्थळी वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध होईल, तसेच रुग्णांचे जीव कसा वाचवला जाईल, याचा विचार करण्यात आला आहे. महामार्गावरील प्राथमिक उपचार केंद्राची गुणवत्ता कशी वाढली जाईल, यावर सेव्ह लाइफ फाउंडेशन अभ्यास करणार आहेत. 108 या क्रमांकावरून आलेल्या संकटकालीन दूरध्वनीमधील घटनांचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारशी सुचवल्या जाणार आहेत.

यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य भवनाचे प्रकल्प संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे, सह संचालक आरोग्यसेवा, यांचा समावेश आहे. या समितीची बैठक महिन्यातून एकदा होणार आहे.

Web Title: Agreement to Prevent Accident on Accelerated Road