

Mumbai Police cyber cell monitoring on BMC Election
ESakal
मुंबई : बीएमसी निवडणुका आता निर्णायक टप्प्यात आल्या आहेत आणि मुंबई पोलिस त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. मुंबई पोलिस सायबर सेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद किंवा दिशाभूल करणाऱ्या कंटेंटची त्वरित जवळच्या पोलिस स्टेशन, सायबर सेल किंवा हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.