

Mankhurd Sees Strong AIMIM Surge, Exceeds Expectations
Sakal
-भाग्यश्री भुवड
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली असली, तरी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने शहराच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३९ वगळता सर्व जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता मर्यादित न राहता विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या मानसिकतेचा थेट प्रभाव दाखवणारा मानला जात आहे.