मुंबई : कोचीहून मुंबईला (Mumbai Airport) येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI2744 चा आज (सोमवार) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान (Air India Incident) अपघात घडला. मुसळधार पावसात लँडिंग करताना विमानाने धावपट्टीवरून घसरत नियंत्रण गमावल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.