मुंबई : एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी ५८ वर्षे होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी ५८ वर्षांवरून वाढवून ६५ वर्षे आणि गैरउड्डाण (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे.