'एअर इंडिया'ला धमकी; 'अपहरण करून पाकिस्तानमध्ये नेऊ'! 

'एअर इंडिया'ला धमकी; 'अपहरण करून पाकिस्तानमध्ये नेऊ'! 

मुंबई : 'एअर इंडिया'च्या विमानाचे अपहरण करून पाकिस्तानमध्ये नेण्याची धमकी आज (शनिवार) दूरध्वनीवरून देण्यात आली. 'एअर इंडिया'च्या मुंबईतील कंट्रोल सेंटरला ही धमकी देण्यात आली. त्यानंतर देशभरातील विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही धमकी म्हणजे खोडसाळपणाही असू शकतो; मात्र सुरक्षा यंत्रणांनी सर्व प्रकारची दक्षता घेण्यास सुरवात केली आहे. यासंदर्भात देशातील सर्व विमानकंपन्या, विमानतळे आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास (सीआयएसएफ) आदेश देण्यात आले आहेत. 

'तुमच्या विमानाचे अपहरण करून आम्ही पाकिस्तानमध्ये घेऊन जाऊ', अशा आशयाची धमकी देणारा दूरध्वनी आज दुपारी करण्यात आला होता', अशी माहिती देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर तातडीने सुरक्षेसंदर्भातील सर्व बाबी काटेकोरपणे तपासण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारने 2014 मध्ये अपहरणविरोधी कायदा मंजूर केला होता. त्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी करण्याच्या आदर्श उपाययोजनांची जंत्रीच दिली आहे. नव्या कायद्यानुसार, अपहरण करणाऱ्या व्यक्तीस देहदंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com