
Air Pollution
ESakal
तुर्भे : पावसामुळे वातावरण काही प्रमाणात स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाशी सेक्टर २६, २८ व २९ परिसरात बुधवारी पहाटेपासूनच धुरकट वातावरण व दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरूवात झाली आहे. एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांतून पुन्हा वायू प्रदूषण सुरू झाले असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.