Air Pollution : राज्यात धोक्याची घंटा! हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या पुढे, सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायजरी

देशाची राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासाळलेली असतानाच राज्याती राजधानी मुंबईत देखील हवा प्रदूषण वाढल्याचे पाहयला मिळत आहे.
mumbai air pollution
mumbai air pollutionesakal
Updated on

देशाची राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासाळलेली असतानाच राज्याती राजधानी मुंबईत देखील हवा प्रदूषण वाढल्याचे पाहयला मिळत आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालये आणि आरोग्य अधिकाऱ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्यामध्ये राज्यातील वायुप्रदुषण व हवेची खराब झालेली गुणवत्ता याबाबत काय उपाययोजना कराव्यात याबद्दल माहिती दिली आहे.

राज्यात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान हिवाळ्यात वातावरणातील प्रदुषित वायु व धुलिकण हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होऊन या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात. नोव्हेंबर २०२३ पासून राज्यात वेगवेगळ्या शहरात हवेची गुणवत्ता खराब होत असुन हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० च्या पुढे गेल्याचे आढळून आल्याचे शासनाने म्हटले आहे.

राज्य शासनाने प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकरिता जनजागृती करणे तसेच वायु प्रदुषणाचे वाईट परिणाम होऊ शकतात अशा घटकांवर होणाऱ्या परिणामांपासून बचावासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सल्ला देण्यात आला आहे. सर्व जिल्हे, महानगरपालिका यांन उपायोजना आणि जनजागृती कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

mumbai air pollution
Effects of Air pollution: हवा प्रदूषणामुळे कर्करोग होऊ शकतो? AIIMS चे डॉक्टर म्हणाले की...

वायू प्रदुषणा वरील आरोग्य सल्ला

वायू प्रदूषण म्हणजे आपण श्वास घेत असलेल्या हवेच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करणाऱ्या वायू आणि धन कणांच्या द्वारे घरातील किंवा बाहेरील हवेचे दूषित होणे. आरोग्यास हानिकारक मुख्य प्रदूषकांमध्ये कणिक पदार्थ (PM2.5 आणि PM10), कार्बन मोनोऑक्साइड (CO), ओझोन (03), ब्लैक कार्बन (BC), सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड (NO) यांचा समावेश होतो. वायू प्रदूषण बहुतेक वेळा उपा डोळ्यांना दिसत नाही कारण प्रदूषकांचा आकार मानवी डोळ्यांपेक्षा लहान असतो.

वायू प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत काय आहेत?

सभोवतालचे (बाहेरचे) वायू प्रदूषण:- वाहनातून बाहेर पडणारे वायू, रस्त्यावरील धूळ, बांधकामाची धूळ,

कचरा जाळणे, शेतीतील पिकांचे अवशेष जाळणे, औद्योगिक उत्सर्जन, जीवाश्म इंधनावर चालणारे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि वीटभट्ट्या, घरातील बायोमास जाळणे, फटाके जाळणे इ. कारणांमुळे होते..

घरगुती वायू प्रदूषण हे लाकूड, कोळसा, शेण, चुलीमध्ये किंवा स्वयंपाक आणि पाणी गरम करण्याच्या उद्देशाने जैव इंधन जाळल्यामुळे होते. घरातील वायू प्रदूषण डासांच्या कॉइल, अगरबती, सिगारेट, बिडी, फवारण्या, सॉल्व्हेंट्स आणि इमारतींच्या आतील भागात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या धुरामुळे होतो.

हवेची गुणवत्ता

वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) हे वायु प्रदूषकांच्या सभोवतालच्या एकाग्रता मूल्यांवर आधारित एक साधन आहे आणि याचे चांगले, समाधानकारक, मध्यम प्रदूषित खराब, अत्यंत खराब आणि गंभीर असे वर्गीकरण केले जाते. विशेषत: एखाद्या क्षेत्रात खराब ते गंभीर श्रेणीत असताना हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बिघडल्याने संसर्ग झालेल्या लोकांमध्ये विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.

वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील परिणाम टाळण्यासाठी काय करावं?

• वायू प्रदूषणाच्या संपर्कांमुळे होणारा धोका खालील गोष्टीद्वारे कमी करता येणे शक्य आहे.

• संघ आणि रहदारी असलेले रस्ते प्रदूषण कारी उद्योगांजवळील शेरे कामाची ठिकाणं

कोळशावर आधारित अशी उच्च प्रदूषण असलेली ठिकाणे, टाळा वीज प्रकल्प व वीटभट्टी इत्यादी ठिकाणी जाणे टाळा.

• एक्यूआय पातळीनुसार बाहेरील कामांचे वेळापत्रक तयार करा आणि खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये घरातच रहा.

• खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी उशिरा चालणे, धावणे, जॉगिंग आणि शारीरिक व्यायाम टाळा.

• सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे उघडू नका, गरज पडल्यास दुपारी 12 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडू शकता..

• लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण, रॉकेल यांसारखे बायोमास जाळणे टाळावे. स्वयंपाक आणि उष्णतेच्या उद्देशाने स्वच्छ धूररहित इंधन (गॅस किंवा वीज) वापरा. बायोमास वापरत असल्यास, स्वच्छ कुक स्टोव्ह वापरा.

• फटाके जाळणे टाळा.

• कोणत्याही प्रकारचे लाकूड, पाने, पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणे टाळा.

• सिगारेट, बीडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थ सेवन नका.

• बंद आवारात डासांच्या कॉईल आणि अगरबती जाळणे टाळावे.

घरांमध्ये झाडू मारण्याऐवजी किंवा व्हॅक्यूम साफ करण्याऐवजी ओल्या कपड्याचावापर करा. आपण व्हॅक्यूम क्लीनर वापरणे निवडल्यास, ज्यात उच्च कार्यक्षमता पार्टिकुलेट पअर (एईपीए) फिल्टर आहे ते वापरा.

• नियमितपणे वाहत्या पाण्याने डोळे धुत रहा आणि कोमट पाण्याने नियमित पणे गुळण्या करा.

• श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना, डोळ्यांमध्ये जळजळ (लाल किंवा पाणी) असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

• निरोगी आहार, अँटीऑक्सिडंट्ससमृद्ध फळे आणि भाज्या आणि पाणी पिऊन पुरेशा प्रमाणात शरीरामधील पाण्याची पातळी राहील याची काळजी घ्या

तीव्र फुफ्फुसीय किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या इत्यादी दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी पुढील गोष्टी कराव्यात

• वायू प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी अधिक काळजी घ्या.

. एक्यूआय पातळी खराब असल्यास कोणतीही कष्टाचे कामे करण्याचे टाळा.

• खराब एक्यूआय पातळीदरम्यान लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवा.

डॉक्टरांच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करा.

• डॉक्टरानी लिहून दिलेली औषधे स्वतः जवळ कायम उपलब्ध ठेवा.

• आवशक वाटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

ऐच्छिक उपाययोजना

डिस्पोजेबल एन 95 किंवा एन 99 मास्क वापरणे उपयुक्त आहे. प्रधुषणात कमी वेळ बाहेर जाणार असल्यास हे मास्क मदत करू शकतात. कागदी मास्क, रुमाल, स्कार्फ आणि कापड प्रभावी नाही. आपण एअर प्युरिफायर वापरणे निवडल्यास, उत्पादकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. निर्देशानुसार फिल्टर बदलण्याची आणि स्वच्छ करण्याची खात्री करा. ओझोन निर्माण करून काम करणारे एअर प्युरिफायर वापरणे टाळा, कारण यामुळे खोल्यांमधील प्रदूषण वाढते. इमारती किंवा वाहनात एअर कंडिशनर चालवताना, बाहेरील हवेशी संपर्क टाळण्यासाठी "री सर्क्युलेट" मोडमध्ये वापरा.

mumbai air pollution
Gram Panchayat Election Results: पवारांच्या बारामतीत भाजपने उघडलं खातं; समान मतामुळे ईश्वरचिठ्ठीने भाजपला तारलं

खालील लोकांना वायू प्रदूषणापासून धोका

1. वयोगट पाच वर्षाखालील मुले व वृद्धापकाळातील व्यक्ती.

2. गरोदर महिला गरोदरपणात दुषित हवेला सामोरे गेल्याने गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतात.

3. दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती ज्यांना श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीचे पूर्वीपासून आजार आहेत त्यांना जास्त धोका असतो.

4. सामाजिक-आर्थिक परिस्थिती ज्यांची पोषणस्थिती खराब आहे आणि ज्यांना गरीबमुळे कच्या घरांच्या परिस्थितीत राहणे भाग आहे. स्वयंपाक, उष्णता आणि प्रकाशासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करणाऱ्या व्यक्तींना जास्त धोका आहे.

5. व्यावसायिक गट वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार. रिक्षाचालक, रिक्षाचालक, रस्त्याच्या कडेला असणारे विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे इतर लोक उच्च धोका आहे. स्वयंपाकासाठी बायोमास (गोवऱ्या/ लाकूड जाळणाऱ्या स्त्रिया घरातील कामामुळे असुरक्षित असतात.

वायू प्रदुषणाचे परिणाम

वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम प्रदूषणाच्या पातळीवर आणि वायुप्रदुषणाला सामोरे जाण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. तसेच प्रदूषणाचा व्यक्तींची आरोग्यावरील परिणामांबद्दल असुरक्षितता देखील जनसांख्यिकीय घटक आणि आरोग्याच्या परिस्थितीच्या आधारे भिन्न असू शकते.

अल्प मुदतीच्या उच्च-स्तरीय वायुप्रदुषणामुळे खोकला, छातीघरघर, डोळे, नाक आणि घशात जळजळ. अस्वस्थता आणि तीव्र श्वसन- नालीकेचे आजार यासारख्या तीव्र आरोग्याच्या समस्या उद्भवू

शकतात. असुरक्षित गटांना श्वसनमार्गाची जळजळ आणि संसर्ग, दम्याचा त्रास, ब्रॉकायटिस हृदयरोग आणि सेरेब्रोव्हस्क्युलर स्ट्रोक सारख्या आजारांची तीव्रता वाढणे यासारखे अधिक गंभीर परिणाम जाणवू शकतात. प्रदूषणाच्या कमी पातळीच्या दीर्घकालीन संपर्कामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तीव्र आजार, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अकाली मृत्यू होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com