नवी मुंबईत हवा प्रदूषण, मॉर्निंग वॉक तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक

नवी मुंबईत हवा प्रदूषण, मॉर्निंग वॉक तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक

मुंबईः खारघर-तळोजा-पनवेल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी  जात  असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरू शकतात, असं निरीक्षण वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशन या संस्थेने  महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निदर्शनास आले आहे. 

तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल वसाहतीमधील नागरिक रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे रहिवासीयांना त्रास होत असल्यामुळे अनेक संस्था, राजकीय व्यक्तीने महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रारी केल्यास तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते. कारवाई होताच तीन चार दिवस हे प्रमाण कमी होते. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. दरम्यान प्रदूषण या विषयावर काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशनने एक महिना एमआयडीसी तळोजा, सेक्टर 13 पनवेल, सेक्टर 36 खारघर, नावडे, तळोजा आणि  सेक्टर 7 खारघर आदी पाच ठिकाणी पार्टिक्युलेट मॅटरची घनता मोजणारे  रिअल टाईम एअर क्वालिटी मॉनिटर्स बसवून 13 नोव्हेंबर ते  13 डिसेंबर या एक महिना तपासणी केली असता.

सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम 2.5 (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदली गेली आहे. जवळपास सर्व दिवसांत हवेच्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली गेली असल्याचे अभ्यासात समोर आले. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स, विशेषतः पीएम  2.5   खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. 'वातावरण' संस्थेने तयार केलेला विस्तृत अहवाल पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तांना, लोक प्रतिनिधींना आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करणार आहे.

खारघर-पनवेल-तळोजा भागातील रहिवाशी श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा  बसविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नागरिकांच्या दखल घेवून  हवेची गुणवत्ता नियमित तपासणं ही वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठीचं धोरण आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी औद्योगिक उत्सर्जन रोखणे, रस्त्यावरील धुळीमुळं होणाऱ्या प्रदूषणाचं व्यवस्थापन आणि पनवेलला शून्य कचरा जाळणारं शहर बनवणं महत्त्वाचं आहे. हवेच्या गुणवत्तेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या पाहता पनवेल महनगरपालिकेने या विषयाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. 
भगवान केसभट संस्थापक वातावरण फाउंडेशन

अभ्यासाअंती काय समोर आलं

अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार पीएम 2.5 ची सर्वाधिक पातळी 141.1   मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर (पाच उपकरणांच्या आकडेवारीची सरासरी) सकाळी सात वाजता नोंदली गेली. जरी पीएम 2.5 ची सर्वाधिक पातळी सकाळच्या काही तासांत नोंदली गेली असली तरी दिवसातील 17 तास इथले रहिवासी प्रदूषित हवेत श्वास घेत होते.

पीएम 2.5 ची (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) सरासरी पातळी सकाळी 7 वाजत(13 ते  नोहेंबर 13 डिसेंबर 2020 ) 


ठिकाण 

पीएम2.5. ची (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) सरासरी 

एमआयडीसी, तळोजा 

197.4 

नावडे

130.5

सेक्टर 36, खारघर

136.4 

सेक्टर 7, खारघर 

128.3 

सेक्टर 13, पनवेल 

113.1

सरासरी 

141.1 

31 दिवसांत पनवेल परिसरात पीएम 2.5 ची पातळी सरासरी 101.12  इतकी होती, जी भारतीय मानकांच्या (60 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत 1.7 पटींनी तर डब्ल्यूएचओ मानकांच्या (25मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त आहे.तसेच  पाचही ठिकाणांपैकी तळोजा एमआयडीसी परिसरात पीएम 2.5 ची पातळी सर्वांत जास्त आढळली. पीएम 2.5 ची 31 दिवसांची सरासरी पातळी येथे 139.27  प्रतिघनमीटर इतकी नोंदली गेली, जी भारतीय मानकांच्या तुलनेत 2.3पटींनी तर डब्ल्यूएचओ मानकांच्या तुलनेत 5.5 पटींनी जास्त आहे. 
फराह ठाकूर, संशोधक 

वातावरण ने केलेल्या या पाहणीनुसार पनवेलमधील पाच लाख लोक सतत पार्टिक्युलेट मॅटर या वायुप्रदूषकांचा सामना करत आहेत. याचा मुख्य स्त्रोत वाहतूक असून त्या खालोखाल औद्योगिक उत्सर्जन आणि रस्त्यावरील धूळ असल्याचे दिसत आहे. या प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसनसंस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात. आता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी गांभीर्याने वायुप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 
डॉ. संदीप साळवी, संचालक पल्मोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फाउंडेशन, पुणे

कोणत्याही ठिकाणचं वायुप्रदूषण हा स्थानिक उत्सर्जन, नजीकच्या परिसरातून व दूरवर होणारे प्रदूषण व त्यावर परिणाम करणारे वातावरण याचा एकत्रित परिणाम असतो. आपल्या हातात असणारी एकमेव गोष्ट म्हणजे स्त्रोतांमध्येच उत्सर्जन कमी करून हवेची गुणवत्ता श्वास घेण्यायोग्य उंचावता येईल.”
सुनील दहिया, विश्लेषक, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर

वातावरणचा हवा पाहणी अभ्यास आपल्याला तळोजा एमआयडीसी आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेत होणारे महत्त्वाचे बदल जाणून घेण्यास मदत करतो. हवेच्या प्रदूषणाने भारतीय सुरक्षित मानकांच्या पातळीहून खूप वरची पातळी गाठली आहे. शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या-त्या वेळची हवेच्या गुणवत्तेची माहिती नागरिकांना वेळेवर मिळण्यास मदत होते व त्यामुळे त्यांच्या आरोग्याची व कल्याणाची शाश्वती मिळते.”
रोनक सुतरिया, संस्थापक आणि संचालक, मुंबईस्थित हवेच्या गुणवत्तेवरील संशोधन संस्था, रेस्पायरर लिविंग सायन्सेस प्रा. लि.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Air pollution Navi Mumbai Morning walk can be dangerous for your health

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com