
महिलेने थेट न्यायालयात जाऊन वकिलाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना भिवंडी न्यायालयात घडली.
म्हणून तिने कोर्टात जाऊन केली वकिलांनाच मारहाण
भिवंडी - जुन्या वादाच्या रागातून एका महिलेने थेट न्यायालयात जाऊन वकिलाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना भिवंडी न्यायालयात बुधवारी (ता.26) सायंकाळी घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दोघा आरोपीविरोधात परस्पर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - फक्त हे कानातले घाला कोणी काढू शकणार नाही तुमची छेड
वकील नवशाद सय्यद असे महिलेकडून मारहाण झालेल्या वकिलाचे नाव असून सदर वकिलाचे आठ महिन्यांपूर्वी 33 वर्षीय महिलेच्या पतीशी वाद झाला होता. त्यावेळी महिलेच्या पतीने पाच ते सहा इसमांसोबत वकील नवशाद सय्यद यांच्याशी वाद केला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीर दखल घेत सदर महिलेच्या पतीस पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी हद्दपार केले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! म्हणून त्याने तिला व्हिडिओ काॅलवर दिला तलाक
या गोष्टीचा राग मनात धरून हद्दपार आरोपीची महिला या वकिलाच्या शोधावर होती, अखेर बुधवारी सायंकाळी तिने थेट भिवंडी न्यायालयात येऊन वकील नवशाद यास मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी वकील नवशाद यांचा साथीदार सहकारी वकील आला असता त्यासदेखील या महिलेने मारहाण केली. सदर प्रकाराबाबत महिला व वकील यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसोझा करीत आहेत.
web title : So she went to court and beat the lawyers
Web Title: So She Went Court And Beat Lawyers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..