esakal | बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक 
sakal

बोलून बातमी शोधा

बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक 

नवी मुंबईची राजधानीशी बरोबरी 

बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली. 

मोठी बातमी - मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वायुप्रदूषणाची पातळी रविवारी घटण्याचा अंदाज असला, तरी ती अतिदूषितच राहील. नवी मुंबई आणि चेंबूर येथील प्रदूषणाची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी धावण्याऐवजी चालण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भांडुप या दोन ठिकाणची हवा श्‍वास घेण्यासारखी होती, तर अंधेरी, चेंबूर, वरळी, माझगाव या ठिकाणची हवा प्रदूषित आणि मालाडची हवा अतिदूषित होती. 

वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 348 मायक्रोग्रॅम होते. त्याखालोखाल मालाडमध्ये हे प्रमाण 303 मायक्रोग्रॅम होते. हे प्रमाण नवी मुंबईतील हवेत 330 मायक्रोग्रॅम, तर दिल्लीतील हवेत 330 मायक्रोग्रॅम होते. 

मोठी बातमी शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा..

पीएम 2.5 प्रमाण (मायक्रोग्रॅम) 

 • ठिकाण - शनिवार - रविवार 
 • दिल्ली - 330 - 318 
 • मुंबई - 242 - 240 
 • नवी मुंबई - 330 - 333 
 • कुलाबा - 158 - 177 
 • माझगाव - 231 - 258 
 • वरळी - 226 - 251 
 • चेंबूर - 284 - 304 
 • भांडूप  - 111 - 138 
 • बोरिवली - 198 - 179 
 • मालाड - 307 - 287 
 • अंधेरी - 236 - 105 
 • बीकेसी - 348 - 335 

 air quality of bandra kurla complex is harmful than delhi

loading image