मुंबईत प्रदूषण वाढलं ! मुंबई, नवी मुंबईची हवा 'अतिशय वाईट' ते 'वाईट' गटात

मुंबईत प्रदूषण वाढलं ! मुंबई, नवी मुंबईची हवा 'अतिशय वाईट' ते 'वाईट' गटात

मुंबई, ता. 26 : नवीन वर्ष येण्यास आता काहीच  दिवस बाकी आहेत. अशात नवीन वर्षाच्या अलीकडेच प्रदूषणात वाढ झाली आहे. वर्षाअखेरीस मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने 'वाईट' हवेची नोंद झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन नववर्षाच्या स्वागताला सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमी संघटनांनी केली आहे.

मुंबईत बीकेसी, माझगांव, मालाड आणि चेंबूर या परिसरात हवेचा स्तर फारच खालावला आहे. बीकेसी परिसर सर्वाधिक प्रदुषित परिसर ठरला असून तेथील हवेची गुणवत्ता 345 एक्यूआय सह 'अतिशय वाईट' नोंदवली गेला आहे. त्यानंतर माझगांव 317 एक्यूआय,  मालाड 311 एक्यूआय , चेंबूर 311 एक्यूआय सह हवेची गुणवत्ता 'अतिशय' वाईट' नोंद म्हणूनवली गेली आहे. त्यानंतर अंधेरी मधील हवेची गुणवत्ता 232 एक्यूआय सह 'वाईट' नोंदवली गेली आहे.  

दिवाळीसह नव वर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यामुळे प्रदुषण वाढत असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सरकारने घातक फटाक्यांसह ग्रीन फटाक्यांवर देखील बंदी आणावी.

- सुमेरा अब्दुलअली , आवाज फाउंडेशन

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता देखील खालावल्याचे दिसत असून 256 एक्यूआय सह हवा गुणवत्तेची 'वाईट' म्हणून नोंद झाली आहे. नवी मुंबईतील प्रदुषणाची पातळी देखील आजही घसरलेली दिसत असून 325 एक्यूआयसह नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता देखील 'अतिशय वाईट' नोंदवली गेली आहे.     

नविन वर्षाच्या अलीकडेच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसते. थंडीचा जोर वाढल्याने  वाऱ्याची गती मंदावली आहे. त्यामुळे धुळीकण वर हवेत न जाता ते जमिनीलगत तरंगत असल्याने प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे सफर कडून सांगण्यात आले. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सफर कडून करण्यात आले आहे.

air quality dropped to harmful just before new year government must ban firecrackers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com