
मुंबई, ता. 16 : देशभरातील वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मुंबईतील प्रदुषणावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीने जोर वाढत असतांऩा मुंबईतील हवेची गुणवत्ता मात्र खालावली आहे. मुंबईतील बीकेसी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट म्हणून नोंदवला गेला आहे.
एक्युआय इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बुधवार 16 डिसेंबररोजी मध्यरात्री मुंबईतील हवेची गुणवत्ता 321 होती. बीकेसी, अंधेरी, बोरिवली, पवई, वसई आणि नवी मुंबईत हवामानाची पातळी अतिशय वाईट म्हणून नोंदवली गेली. तर वरळीच्या हवेची गुणवत्ता हानिकारक म्हणून चिन्हांकित केली गेली. तर 15 डिसेंबररोजी दिवसा देखील वांद्रयाचा निर्देशांक 468 धोकादायक नोंदवण्यात आला होता. कुलाब्याच्या निर्देशांक 50 म्हणजेच चांगला नोंदवला गेला.
गेल्या सात दिवसांत शहरातील सरासरी एक्यूआय 176 असल्याची माहितीही नोंदवली गेली आहे. सर्वात कमी सरासरी 92 इतकी नोंद झाली आहे. तर सर्वाधिक सरासरी 341 आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे 16 नोव्हेंबरपर्यंत सरासरी एक्यूआय 171 होता. सर्वात कमी 58 आणि 27 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक 455 होता.
गेले तिन दिवस मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आहे. अरबी समुद्रामध्ये गुजरातच्या दक्षिणेस वसलेल्या चक्रीवादळांचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. मुंबईत 16 डिसेंबर रोजी रात्रीचे हवामान सरासरी आर्द्रतेसह 25 अंश नोंदवलं गेलं. देशभरात बदललेल्या तापमानाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. हिवाळ्यात हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खराब झाली आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईतील बऱ्याच भागांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे.
air quality of mumbai dropped to dangerous effect of climate change observed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.