मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूच्या घिरट्या

मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूच्या घिरट्या

मुंबई - मुंबईतील एअर ट्रॅफिकमुळे प्रत्येक विमानाला लॅण्डिंगपूर्वी किमान अर्धा तास संपूर्ण शहराभोवती फेऱ्या माराव्या लागतात. अशा स्थितीत तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा पक्षाची धडक बसल्यास ही विमाने भरवस्तीत कोसळू शकतात. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या डोक्‍यावर सतत मृत्यू घिरट्या लागत असतो. 

ट्रॅफिकमुळे विमानतळावरील धावपट्टीवर बराच ताण असल्याने विमानांना हवेतच ताटकळावे लागते. मुंबईत येणाऱ्या विमानांमध्ये अर्धा तास पुरेल एवढा अतिरिक्त इंधनसाठा असतो; मात्र मुंबईवर फिरणाऱ्या विमानांमध्ये बिघाड झाल्यास किंवा लॅण्डिंगसाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागून इंधन संपल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. 

आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळे शहराबाहेर असणे गरजेचे असते. अपघात झाल्यास मोठी हानी होणार नाही, हा त्यामागील उद्देश असतो. मुंबईत विमानतळ सुरू झाला तेव्हा परिसरात फार लोकवस्ती नव्हती. नंतर ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नव्या विमानतळाचा विचार आधीच व्हायला हवा होता, असे मत काही वैमानिकांनी व्यक्त केले. 

वेटिंगमुळे इंधनाचा चुराडा : एअर ट्रॅफिकमुळे इंधन मोठ्या प्रमाणावर खर्च होते. उदा. बोईंग ७४७ या विमानाची प्रवासीक्षमता ५६८ असते. या विमानाला प्रति सेंकद चार लिटर इंधन लागते. म्हणजेच प्रति मिनिट २४० लिटर इंधनाची गरज असते. मुंबई विमानतळावर लॅण्डिंगसाठीचा प्रतीक्षा कालावधी सरासरी ३० मिनिटांचा असल्याने या कालावधीत ७,२०० लिटर इंधनाचा चुराडा होतो.

११२ इमारती बेकायदा
विमानांच्या मार्गातील ११२ इमारती बेकायदा आहेत. तसेच ४०० हून अधिक इमारतींमध्ये बेकायदा मजले चढवण्यात आले होते. या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, उरलेल्या बेकायदा इमारतींमुळे विमानांना धावपट्टीवर १०० मीटर पुढे जाऊन लॅंडिंग करावी लागते, अशी माहिती हवाई वाहतूकतज्ज्ञ विपूल सक्‍सेना यांनी सांगितले. त्यामुळे धावपट्टीच्या वापरावर मर्यादा येतात, असेही त्यांनी सांगितले. तसेच विमानाला अडथळा ठरणाऱ्या बेकायदा झोपड्यांवरही कारवाई गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

कंट्रोल रूमच चुकीची 
मुंबई विमानतळाजवळ बांधण्यात आलेली एअर ट्राफिक कंट्रोल रूम चुकीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता मिठी नदीजवळ हा कंट्रोल टॉवर बांधण्यात येणार आहे. या टॉवरसाठी १०० कोटींचा खर्च झाला होता; मात्र कंट्रोल रूम आयसोलेटेड ठिकाणी अपेक्षित आहे. सध्याचे कंट्रोल टॉवर सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ही जागा  आता बदलण्यात येणार आहे.

45 दर तासाला होणारी विमानांची वाहतूक 
950 मुंबई विमानतळावर ये-जा करणारी विमाने

डोंगरावरील झोपड्यांचा धोका
विमानांच्या मार्गात कुर्ला, घाटकोपर येथील डोंगरांवर झोपड्या आहेत. त्यांच्या छतावर उभे राहिल्यास विमानाला सहज हात लागू शकतो, अशी स्थिती आहे. या झोपड्यांचा धोका टाळूनच विमानांचे लॅण्डिंग करावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com