
मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमान वाहतुकीला लेटमार्क लागला आहे. खराब हवामानामुळे अनेक उड्डाणांवर परिणाम झाला, काही उड्डाणे रद्द करण्यात आली आणि एक उड्डाण वळवण्यात आले.