तीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७) मुंबईत आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नवीन याने विमानातील आसनाखाली दडवून प्रत्येकी एक किलोचे दोन बार आणि अर्ध्या किलोचे सोन्याचे दोन तुकडे आणले होते. मिळालेल्या माहितीवरून हवाई गुप्तचर विभागाने नवीनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्या वेळी सोने आणल्याचे त्याने कबूल केले. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८४ लाख ५९ हजार रुपये आहे. सीमाशुल्क कायद्यानुसार नवीन याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Airline traveler arrested on mumbai airport

टॅग्स