ऐरोली रुग्णालयात सीसी टीव्ही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

तुर्भे - महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि वाशी बस डेपोत वाणिज्य संकुल बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

तुर्भे - महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि वाशी बस डेपोत वाणिज्य संकुल बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ऐरोलीतील जिजामाता भोसले रुग्णालयाचे घाईघाईत उद्‌घाटन करण्यात आले. तेथील समस्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी उपोषण केले होते. त्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे हाही मुद्दा होता. त्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामस्वामी यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यायला लावले होते. एनएमएमटी तोट्यात आहे. याचा विचार करून माजी नगरसेवक व परिवहन सदस्य जब्बार खान यांनी बसस्थानकांचा वाणिज्य विकास केल्यास त्यामुळे महसूल मिळेल व तोटा कमी होईल, असे सांगितले होते. 

Web Title: Airoli Hospital CC TV