ऐरोलीत महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
ऐरोलीत महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक

ऐरोलीत महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक

नवी मुंबई : ऐरोलीतील चिंचपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाने ऐरोली सेक्‍टर ६ मधील गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेला जबरदस्तीने पकडून तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
उमेश राजकुमार गौड (२३) असे या तरुणाचे नाव असून, रबाळे पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तक्रारदार महिला ऐरोली सेक्‍टर 6 मध्ये राहावयास असून शनिवारी (ता.७) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्या ताराबाई फुलचंद मढवी गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी गार्डनमध्ये आरोपी उमेश गौडा हादेखील गेला होता. या वेळी गार्डनमध्ये महिला एकटीच असल्याचे पाहून आरोपी उमेश गौडा याने तिला पाठीमागून जबरदस्तीने पकडून तिच्याशी अश्‍लील चाळे केले. या वेळी पीडित महिलेने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यानंतर तिने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी उमेश गौडा याला विनयभंगाच्या गुह्याखाली अटक केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com