esakal | अजित पवार-फडणवीस 10 दिवसांपासून होते संपर्कात?
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार-फडणवीस 10 दिवसांपासून होते संपर्कात?
  • बैठकांचे 10 दिवस राष्ट्रवादीला पडले भारी
  • सत्तास्थापनेपूर्वीच अजित पवारांनी राष्ट्रवादीची सोडली साथ

अजित पवार-फडणवीस 10 दिवसांपासून होते संपर्कात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

...शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असतानाच दुसरीकडे वेगळंच राजकीय नाट्यसुरू होतं. याच बैठकींचे 10 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडलेयत. बैठकांमधली सगळी तंतोतंत माहिती भाजपला पुरवली जात होती. आणि ही गोपनीय माहिती कोण पुरवत होतं हे शनिवारी अख्ख्या देशानं पाहिलं.

सत्तास्थापनेपूर्वीच शरद पवारांचा पुतण्या अजित पवार आपल्या काकांची साथ सोडून भाजपच्या गोट्यात सामील झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला.

17 नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर भाजपाला सरकारस्थापनेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावला होता असंही बोललं जातंय.

पण, यादरम्यान अजित पवारांच्या मनात नक्की काय चाललंय हे शरद पवारही ओळखू शकले नाहीत. अखेर अजित पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत संधान साधलं.

अजित पवार, धनंजय मुंडे, खासदार सुनिल तटकरे यांनीही शरद पवारांकडे भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, काँग्रेस, शिवसेनेशी बोलणी शेवटच्या टप्प्यात असल्यानं पवारांनी यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.

सध्या मोठ्या पवारांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झालंय. मात्र,अजित पवार हे एका बाजूला पडल्याचं दिसतंय. मात्र, हा राजकीय भूकंप झाला कसा ? अजित पवारांनी अचानक भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला?

दरम्यान भारतीय जनता पक्ष  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला खोटे पाडत आहेत, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे केला.

WebTitle : ajit pawar and fadanavis was in touch since last ten days is the question

loading image