Badlapur School Case: "गुन्हेगारांची हयगय नाही..." बदलापूर प्रकरणावर अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar Badlapur School Case: मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar Badlapur School Case
Ajit Pawar Badlapur School CaseEsakal
Updated on

बदलापूरमधील शाळेत दोन चिमकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र याविरोधा संताप पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबई परिसरातील नागरिकांनी शाळेला घेराव घालत बदलापूरमध्ये रेल रोको केला आहे.

याची दखल घेत मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही आयुक्तांना दिले आहेत.

आता याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. यामध्ये पवार यांनी सरकार गुन्हेगारांची हयगय करणार नसल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाल अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, "बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही."

पवार यांनी पुढे लिहिले की, "हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हयगय केली जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी जलद गतीने व्हावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेकींना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे."

Ajit Pawar Badlapur School Case
Badlapur School Case: फाशीच्या शिक्षेवर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! SIT ते फास्ट ट्रॅक कोर्ट, शिंदे सरकारने उचलली कठोर पाऊले

महाजनांची मध्यस्थी निष्फळ

दरम्यान बदलापूर स्टेशन आणि प्रकरणातील शाळेपाशी आंदोलन करणाऱ्यांनी आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. सकाळपासून आंदोलन करणारे हे आंदोलक अजूनही तिथेच असून ते कोणाचीहे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्यांचे काहीही एकले नाही. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुद्धा निष्फळ ठरला.

Ajit Pawar Badlapur School Case
Badlapur School Crime: लाडकी बहि‍ण नको न्याय द्या! संतप्त आईचा सवाल! बदलापूर घटनेत आरोपींना फाशी देण्याची मागणी

काय आहे प्रकरण?

बदलापूरमधील एका शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये 4 वर्षांच्या दोन निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात संतापाचे वातावरण असून सकाळपासून निदर्शने होत होती.

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (२३) याला पॉक्सो आणि बीएनएसच्या इतर कलमांखाली अटक केली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com