esakal | रात्री राष्ट्रवादीसोबत अन् सकाळी फडणवीसांसोबत; अजित पवारांना घेतले फैलावर
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar getting troll due to yesterdays tweet

अजित पवारांनी काल (ता. 22) संध्याकाळी एक ट्विट केले होते, या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. 

रात्री राष्ट्रवादीसोबत अन् सकाळी फडणवीसांसोबत; अजित पवारांना घेतले फैलावर

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (ता. 23) देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या धक्कातंत्राने संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. या सगळ्यात सोशल मीडियाने लक्ष वेधून घेतले आहे.
अशातच अजित पवारांनी काल (ता. 22) संध्याकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवारांनी ट्विट केले आहे की, 'आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सत्तास्थापनेबाबत चालू घडामोडींवर मित्र पक्षांशी सकारात्मक चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीला मी उपस्थित होतो. यादरम्यान मित्र पक्षातल्या नेत्यांची सुद्धा मतं जाणून घेतली.' काल असे ट्विट करून आज राष्ट्रवादीला धक्का दिल्याने अजित पवारांवर टीकेची झोड उठत आहे. 

अजित पवारांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी अनेक रागीट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या.

फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो. 

अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

स्थिर सरकारसाठी घेतला निर्णय : अजित पवार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत चर्चा संपतच नव्हती. त्यामध्ये नको त्या गोष्टीची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी यासाठी हा निर्णय मी घेतला.