esakal | अजित पवारांनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली - सुधीर मुनगंटीवार
sakal

बोलून बातमी शोधा

 Sudhir Mungantiwar

अजित पवारांनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली - सुधीर मुनगंटीवार

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर भाजपा (bjp) चांगलाच आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA govt) या निर्णयाविरोधात भाजपाने आज राज्यभरात जोरदार आंदोलनं केली. विधानसभेच्या आवारातही याचे पडसाद पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर (Maharashtra assembly) भाजपाने अभिरुप विधानसभा (vidhansabha) सुरु केली होती. काही वेळाने विधानसभेच्या परिसरात असणाऱ्या मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले. त्यानंतर भाजपचे नेतेमंडळी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. (Ajit pawar kill mhatma gandhi thoughts sudhir mungantiwar)

राज्य सरकारच्या कारभारावर भाजपाच्या नेत्यांनी अत्यंत बोचरी टीका केली. माजी अर्थमंत्री आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल दरवाढ हे राज्यसरकारचे पाप असल्याचे म्हटले आहे. "धान्यामध्ये सरकार कमिशन खात आहे. देवाच्या न्याय व्यवस्थेतून कसे सुटाल?" असा सवालही त्यांनी केला.

"पुढच्या जन्मी, नाहीतर पिंजऱ्यात राहाल. राज्याचे मुख्यमंत्री हे जोडे देण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काँग्रेसला जोडे देण्याची भाषा करता" असे मुनगंटीवार म्हणाले. "माझी दारू, माझे आरोग्य असा नारा सरकारने द्यायला हवा. अजितदादा पवार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या केली" असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

हेही वाचा: मुस्लिमांची नाव का टाकली? माझं नाव टाकायचं? - नाना पटोले

नितेश राणे काय म्हणाले...

"माझे १२ सहकारी ओबीसी आणि मराठा समाजाठी लढले आहेत. महाराष्ट्रासाठी कोणी लढत असेल तर त्याचा सार्थ अभिमान आहे" असे नितेश राणे म्हणाले. आजचा अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे, त्या बद्दल काय रणनीती असेल, या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले की, "रणनीती ठरेलच. पण आम्ही लढतच राहणार. हे शेंबडयासारखे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले."

हेही वाचा: माझ्यावरच्या आरोपांचा तपास करणं, ही राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी - प्रताप सरनाईक

प्रविण दरेकर काय म्हणाले...

"लोकशाहीचा खून, हत्या करण्याचं काम ठाकरे सरकारने केलय. विधिमंडळात शेतकरी, ओबीसी, मराठा आरक्षण आणि एमपीएसई असे गंभीर विषय असताना, सरकार मुस्काटदाबी करण्याचं काम करतय" असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. "जनतेचे प्रश्न, जनतेच्या मनातील असंतोष सभागृहात मांडण्यापासून रोखण्याचं काम हे सरकार करतय" असे प्रवीण दरेकर म्हणाले.

loading image