शरद पवार जिंदाबाद, अजित पवार मुर्दाबाद; विधिमंडळ नेतेपदावरूनही हकालपट्टी 

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मुंबई : मुंबईत आज, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असताना बैठकीच्या बाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना 'शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुंबई : मुंबईत आज, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असताना बैठकीच्या बाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना 'शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अजित पवारांविरोधात घोषणाबाजी 
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवत, भाजपच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिल्याचा दावाही भाजप नेत्यांकडून करण्यात आला. या सगळ्यात अजित पवार तिन्ही पक्षांसाठी खलनायक ठरले आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्येही अजित पवार यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळेच तीन पक्षांची बैठक असलेल्या वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, अजित पवार मुर्दाबाद अशी घोषणाबाजी सुरू केली आहे. शरद पवार जिंदाबाद, अजित पवार मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यास सुरू केले आहे. 

आणखी वाचा : पवार कुटुंबात उभी फूट 

आणखी वाचा : अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

अजित पवारांची पदावरून हकालपट्टी 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदावर असलेल्या अजित पवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे. विधिमंडळ पक्षाचे गट नेते असल्यामुळेच अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी, अजित पवार यांनी सह्यांच्या पत्राचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच अजित पवार यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar murdabad ncp workers raise slogans outside y b center