

Ajit Pawar NCP Manifesto
ESakal
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात शहरातील रहिवाशांना अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. मुंबईला केवळ शहर न बनवता प्रत्येक मुंबईकराच्या स्वप्नांचे शहर बनवणे हे पक्षाचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि शाश्वतता यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी ठोस योजना मांडल्या.