esakal | Rave Party: "मुलगा कुणाचाही असो..."; आर्यन खान प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रीया
sakal

बोलून बातमी शोधा

Rave Party case

"मुलगा कुणाचाही असो..."; आर्यन खान प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रीया

sakal_logo
By
सुधीर काकडे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकला असून, सध्या त्याला एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानवर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार की नाही ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे. कायद्यासमोर कुणालाही माफी नाही अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया दिली.

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सध्या क्रुज रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एनसीबीला आर्यन खानकडे अमली पदार्थ सापडले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना आपल्याला या प्रकरणाबद्दल जास्त माहिती नाही असे म्हणत, मुलगा कुणाचाही असला तरी कायदा सर्वांना सारखाच असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: आर्यन खानला का झाली अटक?; जाणून घ्या...

दरम्यान, केवळ बॉलीवूडच नाहीतर देशभरातील वेगवेगळ्य़ा सेलिब्रेटींची मुलं सध्या मुंबई - गोव्याच्या त्या क्रुझ ड्रॅग्ज प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण जास्त चर्चेत आलं त्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं नाव त्यात आल्यावर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीनं जे ड्रग्ज जप्त केलं आहे त्यात कोकेन आणि एम डी ड्रग्जचचा समावेश आहे.

loading image
go to top