अजित पवार यांनी सोडली भाजपची साथ; अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

 गेला महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा दिलाय. सूत्रांच्या हवाल्याने ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. 

मुंबई : गेला महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा दिलाय. सूत्रांच्या हवाल्याने ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजित पवार यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. अशातच काही वेळातच फडणवीस देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवण्याचे वृत्त  समोर येतंय. 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

काल रात्री अजित पवार यांना मानणारे १७ आमदार ट्रायडन्टकडे आल्याचे सांगितले जातंय. केवळ ही संख्या पुरेशी नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात आणून दिल्याने अखेर त्यांनी बंड मागे घेतल्याचं देखील सूत्रांकडून सांगितलं जातंय. 

देवेंद्र फडणवीसही देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती.

Webtitle : ajit pawar resigns from the post of deputy CM of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar resigns from the post of deputy CM of maharashtra