esakal | महाराष्ट्रातील राजकीय नट्यानंतर अजित पवार यांची 'पहिली' प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील राजकीय नट्यानंतर अजित पवार यांची 'पहिली' प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील राजकीय नट्यानंतर अजित पवार यांची 'पहिली' प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

"आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीने भूमिका मांडीन" असं वक्तव्य अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलंय. त्यामुळे अजित पवार आपल्या मनातील भावना स्पष्ट करणार आहेत. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर अजित पवार यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य येताना पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या शांततेमागे मोठं वादळ दडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 

अजित पवार सध्या मुंबईत असल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील नेपियनसी रोडवर असलेल्या इमारतीत अजित पवार सध्या वास्तव्यास असल्याची माहिती एका मराठी वूत्तावाहीनीला मिळाली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी आता काहीच बोलणार नाही. माझ्या सोयीने भूमिका मांडीन असं अजित पवार यांनी  वृत्तवाहिन्यांना दिली.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत

दरम्यान काही वेळा पूर्वी अजित पवार यांच्याकडून काही सह्या घेतल्या गेल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर त्यांना भाजपच्या नेत्यांशी देखील संपर्क ठेवायचा असल्याने सध्या अजित पवार घाई गडबडीत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान वृत्तवाहिनेने संपर्क साधला असता मुंबईतील नेपियनसी रोडवरील इमारतीत त्यांच्या भावाच्या घरी कुटुंबासोबत जेवताना पाहायला मिळाले.  

महाराष्ट्राने राजकारणातील मोठा  ट्विस्ट आज सकाळी घडताना पहिला. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.   

Web Title : Ajit Pawars first statement after taking oath as deputy CM of maharshtra

loading image
go to top