

Dahihandi Govinda Fell
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026 ) उत्सव मोठ्या उत्साहात-थाटामाटात साजरा केला जात आहे. विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक गोविंदा पथकाकडून उंच थर लावण्याची शर्यत सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान अनेक अपघाताच्या घटना घडल्याच्या समोर येतात. अशीच एक घटना मुंबईतील मनसेच्या गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीमध्ये ९व्या थरावरील गोविंदा कोसळल्याची घटना घडली आहे.