esakal | अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

एक महिन्यात सराफा बाजाराचे 60 हजार कोटीचे नुकसान

अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 25 : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सराफ बाजाराला मोठा फटका बसला आहे. गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या दोन मुहूर्तावर लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. तर याच दरम्यान लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याचा व्यापार तेजीत असतो. पण लॉकडाऊन मुळे सोन्याचा व्यापार बंद आहे. आता एक महिना झाला मुंबईतील सराफा बाजार शटडाऊन आहे. निदान अक्षय तृतीयाला सोन्याची विक्री व्हावी म्हणून राज्यातील प्रमुख सोने व्यापारांनी सोने खरेदीचा ऑनलाईन पर्याय उपलब्ध केला आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, लागू बंधू, कल्याण ज्वेलर्स, तनिष ज्वेलर्स अशा सोन्याच्या दागिनांच्या दुकानांनी स्वतःच्या संकेतस्थळावर सोने खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय दिला आहे. त्यामुळे लोकांना घरपोच सोने मिळू शकते. 

पाकिस्तानी अधिकाऱ्यालाही 'या' भारतीय वैमानिकाचं कौतुक करण्यावाचून राहवलं नाही, वाचा असं काय घडलं...

राज्य भरात मार्च ते मे दरम्यान सोन्याची सुमारे 200 कोटीची उलाढाल होते. तर अक्षय तृतीया उलाढाल दुपप्ट असते. परंतु लॉकडाऊन मुळे राज्यातील सराफा बाजाराचे 60 हजार कोटीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली. तसेच ते म्हणाले, सोने खरेदीसाठी अक्षय तृतीयाचा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लोक दिवशी सोने खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या ज्वेलर्स ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय उपलब्ध केला आहे.

त्यावर नाणी ते ज्वेलरी डिझाईन उपलब्ध करुन दिल्या आहे. त्याद्वारे ग्राहक सोन्याची नोंदणी करू शकतात. तसेच अक्षय तृतीया निमित्त खास दरवर्षी प्रमाणे सोन्याच्या घडणावळीवर 30 टक्क्यांपर्यत सूट दिली तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 45 टक्क्यापर्यंत सूट दिली आहे. पैशाचा व्यवहार ऑनलाईन असणार आहे. आतापर्यंत 10 ते 12 ग्राहकांनी फोनवरून सोन्याच्या नोंदणी बाबत विचारणा केली. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांना घरपोच डिलेव्हरी देण्यात येईल, असे जैन यांनी सांगितले. 

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

लॉकडाऊनमुळे लग्नसरायाही लोकांनी पुढे ढकलल्याला. त्यामुळे लग्नसराईच्या दागिनांच्याही ऑर्डरमध्ये घट झाली. पण आता लग्नसराई दिवाळी नंतर होतील त्यामुळे तेव्हा सोन्याचा व्यापार तेजीत असणार आहे. ऑनलाईन सोने खरेदीमुळे सोने व्यापारांचा 10 टक्के नफा मिळेल, त्याहून जास्त खरेदी होणे शक्य नाही. लोकांना प्रत्यक्षात सोने पारखून घेण्यावर जास्त भर आहे. मात्र नाणे आणि वळ याची खरेदी ऑनलाईन होईल, असा अंदाज कुमार जैन व्यक्त केला. मागील वर्षी 37 हजार रुपये होता आताचा सोन्याचा दर 47 हजार रुपये आहे.

this akshay trutiya follow these steps and buy gold read full story