पाकिस्तानी अधिकाऱ्यालाही 'या' भारतीय वैमानिकाचं कौतुक करण्यावाचून राहवलं नाही, वाचा असं काय घडलं...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

मोहनीश विमान घेऊन जर्मनीला जाणार हे समजल्यानंतर त्याचे आई-वडील चिंतेत पडले होते. मात्र मोहनीशला पीपीई सूट आणि मास्क लावूनच जावं लागणार आहे असं समजल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

मुंबई : भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तातडीनं केंद्र सरकारकडून आतंरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या काही विदेशी नागरिकांची गैरसोय झाली होती. आपल्या मायदेशात परत कसं जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण आला होता. मात्र युरोपात कोरोनानं थैमान घातलं होतं.

भारतात अडकलेल्या जर्मनीच्या काही नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णयाचे एअर इंडियानं घेतला खरा मात्र कोणता वैमानिक हे विमान घेउन जर्मनीला जाणार यावर शंका होती. एअर इंडियानं याबद्दल विचारणा केली असता एक तरुण वैमानिक हे जोखमीचं काम करण्यासाठी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता होकार देऊन मोकळा झाला. या वैमानिकाचं नाव आहे मोहनीश परब. मराठमोळा मोहनीश गोरेगावात आपल्या आई वडिलांसोबत राहतो.

3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

मोहनीश विमान घेऊन जर्मनीला जाणार हे समजल्यानंतर त्याचे आई-वडील चिंतेत पडले होते. मात्र मोहनीशला पीपीई सूट आणि मास्क लावूनच जावं लागणार आहे असं समजल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. मोहनीशनं त्याच्या ३ साथीदारांसह जर्मनीला जाऊन तिथल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशात सोडलं. मात्र तिथे न थांबता मोहनीश लगेचच भारतात परतले. तब्बल २० तासांचा प्रवास त्यांनी केला.    

पाकिस्ताननं केलं कौतुक:

भारतात अडकलेल्या या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पोहोचण्यासाठी  आणि काही मदत साहित्य पोहोचवण्यासाठी एअर इंडियाची दोन विमानं पाठवण्यात आली. टेक ऑफच्या काही वेळातच ही विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचली. त्यावेळी ज्या प्रकारची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडून आली ती अनपेक्षित होती. पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडून त्यांचं  "अस्सलाम वालेकूम' असं म्हणत स्वागत करण्यात आलं. तसंच "मदत साहित्य घेऊन जाण्याचं जे काम तुम्ही करताय ते कौतुकास्पद आहे" असंही पाकिस्तानकडून कौतुक करण्यात आलं.

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

इतकंच नाही तर इराणनं जो १००० किलोमीटरचा हवाई मार्ग फक्त आणि फक्त युद्धकाळासाठी राखून ठेवला होता तो मार्ग या एअर इंडियाच्या विमानांना मोकळा करून दिला. ज्यामुळे त्यांना थेट युरोपात जाणं शक्य झालं. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी या वैमानिकांचे आणि एअर इंडियाचे जाहीरपणे आभार मानले.

मोहनीश त्यांच्या साथीदारांसह १९२ प्रवासी आणि काही मदत साहित्य घेऊन फ्रँकफर्टला पोहोचले. तिथे विमानातून एक क्षणही न उतरता ते भारतात परतले. अशा मराठमोळ्या धाडसी वैमानिकाला आणि योध्याला सलाम  केलाच पाहिजे.

pakistani air traffic control room congratulate indian pilot read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani air traffic control room congratulate indian pilot read full story