Akshaya Tritiya in Mumbai : 'सोन्या'चा मुहूर्त

Vashi Shopping Market : अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी लगबग सुरु ; बाजारपेठ सजल्या
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी साठी सराफ बाजारपेठ सजल्या आहेत.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी साठी सराफ बाजारपेठ सजल्या आहेत.esakal

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. घराघरांत होणाऱ्या पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजा सामग्रीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. या दिवशी होणारी सोने खरेदी लक्षात घेता सराफ बाजारही सज्ज झाला आहे.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी साठी सराफ बाजारपेठ सजल्या आहेत.
Akshaya Tritiya 2024 : पुण्यात यंदा ६ हजार नवीन वाहनांची खरेदी; दुचाकी सुसाट

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात कायम भरभराट होईल आणि लक्ष्मीचे वास्तव्य राहील, अशी त्यामागची लोकभावना असते. त्यामुळे सराफ बाजारातील दुकाने अलंकाराच्या आकर्षक व वैविध्यपूर्ण दागिन्यांनी सजली आहेत.अक्षय्य तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर घर खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी साठी सराफ बाजारपेठ सजल्या आहेत.
Akshay Tritiya 2024 : सोन्याचा लखलखाट अन् अक्षय होवो घराची भरभराट! अक्षय तृतीयेच्या मनाला भावणाऱ्या शुभेच्छा

वाहन खरेदीचे बुकिंग सुरु :

वाहनखरेदीसाठीदेखील अनेकांनी डिलरकडे बुकींग केली आहे. त्यामुळे वाहन बाजारातदेखील तेजीचे वातावरण आहे. कोरोनानंतर स्वतंत्र वाहन खरेदीकडेदेखील अनेकांचा कल वाढलेला आहे. त्याचप्रमाणे सध्या वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे अनेकांचा एसी, फ्रीज, कुलर घेण्याकडे कल असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुकींगदेखील केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com