भाईंदर : शवविच्छेदन केंद्रात मद्यपार्टी; आठ जणांवर गुन्हा दाखल | Bhayandar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol party

भाईंदर : शवविच्छेदन केंद्रात मद्यपार्टी; आठ जणांवर गुन्हा दाखल

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील महापालिकेच्या (Mira bhayandar Municipal corporation) शवविच्छेदन केंद्रात (Postmortem department) कर्मचाऱ्यांनी होळीच्या निमित्ताने चक्क मद्यपार्टी (Alcohol Party) केल्याचे उघडकीस आले आहे. कर्मचाऱ्यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात बंदीस्त केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे; मात्र या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीवरच हल्ला करून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police fir filed) आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: रायगड : जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न; सहा जणांविरोधात गुन्हा

शुक्रवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन केंद्रात रुग्णवाहिकेच्या चालकासह काही कर्मचारी मद्यपान करत असल्याची माहिती स्थानिक पत्रकार अनिल नौटियाल यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन कर्मचाऱ्यांचे हे कृत्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. ते पाहताच कर्मचाऱ्यांनी नौटियाल यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रसंगावधान राखून नौटियाल तेथून निघून थेट भाईंदर पोलिस ठाण्यात गेले आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिस तात्काळ शवविच्छेदन केंद्रात गेले; मात्र तोपर्यंत सर्व कर्मचारी तेथून पळून गेले होते. पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

Web Title: Alcohol Party In Postmortem Department In Bhayandar Police Fir Filed Against Eight People Bhayandar Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bhayandarcrime update
go to top