मद्यधुंद एसटीचालकाची हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या मुजोर चालकाची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला दोन तासांत बडतर्फ करण्याची कडक कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाला दिले आहेत.

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या मुजोर चालकाची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला दोन तासांत बडतर्फ करण्याची कडक कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाला दिले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकात गुरुवारी (ता. 25) अमोल चोले या चालकाने मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बसचा ताबा घेतला. त्याने बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला.

परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन चोले याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याच्या विभाग नियंत्रकांनी या चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcoholic ST Driver Suspend Crime divakar rawate