भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

ठाणे : भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे 1.25 मीटर इतके उघडण्यात येऊन धरणातून सुमारे 444 क्‍युसेक्‍स विसर्ग प्रवाहित केला जात आहे.

भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे यांनी दिल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert to nearest Villages of Bhatasa River