esakal | खालापुरात बेशिस्तीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

खालापुरात बेशिस्तीचे दर्शन

रविवारी शांत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पुण्याकडे जाणारी वाहनांची खालापूर टोल नाक्‍यावर संख्या प्रचंड होती. यामध्ये कारची संख्या जास्त होती.

खालापुरात बेशिस्तीचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खालापूरः रविवारी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करणारे सोमवारी मात्र बेदरकारपणे वागताना दिसून आले. रविवारी निर्मनुष्य असलेले रस्ते पुन्हा वाहनांच्या गर्दीने गजबजून गेले.

रविवारी शांत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पुण्याकडे जाणारी वाहनांची खालापूर टोल नाक्‍यावर संख्या प्रचंड होती. यामध्ये कारची संख्या जास्त होती. मालवाहू वाहन कमी असताना कारची मात्र टोल नाक्‍यांवर रांग लागल्याचे चित्र होते. मुंबई-पुणे राष्ट्रीय (जुन्या) महामार्गावर दुचाकींची संख्या प्रचंड होती. बाईक रायडर्स ग्रुपने बाहेर पडल्यामुळे कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत होते.

महाराष्ट्रात संचारबंदी लागू

अलिबागमध्ये "लॉकडाऊन'ला प्रतिसाद
अलिबागः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेला अलिबागकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अलिबाग तालुक्‍यातील विक्रम मिनीडोर, रिक्षा व अन्य दुकाने व्यावसायिकांनी बंद ठेवले आहेत. त्यामुळे गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाने ाज्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या प्रार्दुभावामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील विक्रम मिनीडोरचालक-मालक संघटना, रिक्षा संघटना, कपडे, खाद्यपदार्थ, अन्य वस्तू, साहित्यांची विक्री करणारी अनेक दुकाने बंद ठेवली आहेत. अलिबाग बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर अंकुश ठेवण्यास यश आले आहे. फक्त भाजी, फळ, दूध विक्रेते, किराणा तसेच औषधांची दुकाने चालू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी 31 मार्चपर्यंत बंद पाळण्यात आला आहे. 

मिनीडोर सेवा बंद 
प्रवासी वाहतूक करताना कोरोनापासून आपणासही धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हा विक्रम, मिनीडोरचालक-मालक संघटनेच्या वतीने 31 मार्चपर्यंत मिनीडोर सेवा बंद केली आहे. कोणी गाडी चालू ठेवली तर कारवाई झाल्यास संघटना जबाबदार राहणार नाही. 
- विजय पाटील, अध्यक्ष, जिल्हा मिनीडोरचालक-मालक संघटना