मोठी बातमी - महाराष्ट्रात संचारबंदी लागू ; जिल्ह्यांच्या बॉर्डर्स देखील केल्यात सील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

महारष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा हा ८९ वर गेलाय. दिनांक २३ मार्च रोजी तारखेला सरकारकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीये.  

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधला. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. याबाबत महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाबाबत आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांबद्द महत्त्वपूर्ण माहिती दिलीये.  

यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम १४४ नंतर महाराष्ट्रात आता संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. आज सकाळी मुंबई आणि पुण्यातील अनेक जण कामकाजासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळालेत. अशात राज्यात संचारबंदी लागू करण्यात यावी अशी सातत्याने मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मोठी बातमी :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 'ही' मोठी गुड न्यूज...

याचसोबत आजपासून जिल्ह्यांतर्गत सीमा देखील सील करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपण कोरोना वायरस सोबतच्या लढ्यात निर्णयाक टप्प्यावर आहोत. आता थांबवता आले नाही तर जगभराप्रमाणे भारतातही कोरोना थैमान घालेल. संयम आणि निश्चिय पाळा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. 

उद्धव ठाकरे मांडलेले महत्त्वाचे मुद्दे : 

 • चार ते पाच लोकांपेक्षा अधिक लोकं एकत्र येता कामा नये. आंतरराज्य जिल्हा सीमा बंद
 • आंतरराज्य वाहतूक देखील बंद करण्यात आळिते 
 • देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याची पंतप्रधानाकडे मागणी केली आहे.
 • जीवनावश्यक वस्तू, मेडिकल, बेकरी, पशूखाद्य, दवाखाने उघडे राहतील
 • कृषीउद्योग, खतांची कारखाने आणि त्यांची वाहतूक सुरू राहतील
 • सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद राहणार, यामध्ये पुजाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही परवानगी नाही 

मोठी बातमी : उद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये ?

 • बस या अत्यावश्यक सेवांसाठी वापरल्या जातील 
 • खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येणार
 • अंगणवाडी सेविका आणि होमगार्डना ट्रेनिंग देवून आवश्यक सेवेसाठी वापरले जाऊ शकतो. तसे आदेश देण्यात आलेत 
 • संशयित रूग्णांमुळे प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींनी काळजी घ्यावी
 • खासगी वाहनं देखील रस्त्यावर धावणार नाहीत 
 • अत्यावश्यक कारणासाठीच रिक्षा किंवा टॅक्सी वापरात येईल 
 • यामध्ये चालक + १ व्यक्ती हे रिक्षेतून तर चालक + २ असे टॅक्सीमधून प्रवास करू शकणार आहेत 

महारष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा हा ८९ वर गेलाय. दिनांक २३ मार्च रोजी तारखेला सरकारकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीये.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communication block in maharashtra due to corona threat all inter state district borders are sealed