मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

अलिबाग - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 29 ते 31 डिसेंबर दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने 23 डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्याची दखल घेत डॉ. सूर्यवंशी यांनी आज सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहतूक 29 ते 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि वाहतूक पोलिसांनी करावे असे सांगत, वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरणारे महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: alibag konkan news mumbai-goa highway heavy transport ban